साहित्य पाठवण्यासाठी

tejasvitadiwali@tkgoi.com  | 022 69647066

आपले साहित्य कृपया पुढील प्रकारे लिहून पाठवा.

१. साहित्य सुस्पष्ट मराठीत असावे. त्याला महाराष्ट्रातील बोलीभाषेचा टच असलेला चालेल.

२. शक्यतोवर श्री लिपीत टायपिंग करून पीडीएफ मध्ये साहित्य पाठवावे. पीडीएफ पाठवताना सोबत कोरल, पेजमेकर, वर्डची ओपन फाईल सुद्धा पाठवावी लागेल.

३. जर स्पर्धेसाठी नोंदणी करत असाल तर त्यावर स्पर्धेचा उल्लेख असावा.

४. धार्मिक, राजकीय, सामाजिक वैगेरे भावना दुखावणार नाही असेच साहित्य पाठवावे.

५. लेख, कविता, लघु कादंबरी, कथा, भयकथा चालेल.

६. आधी प्रकाशित, दुसऱ्याचे साहित्य स्वीकारले जाणार नाही.

७. आपल्या साहित्याला साजेसा फोटो असेल तर खूप उत्तम. शक्यतोवर तो फोटो पाठवायचा प्रयत्न करा.

८. साहित्य व्यवहारी आणि पटतील अश्या तर्कांवरच आधारित असावे. त्याला रहस्यमय टच असला तर चालेल, पण ताळमेळ असावा. लेख असेल तर त्यासाठी योग्य पुरावे आणि संदर्भ असावे. आत्मप्रसिद्धी, आरोप, तर्कविसंगत साहित्य स्वीकारले जाणार नाही.

९. साहित्य का स्वीकारले गेले नाही याची कारणे देण्यासाठी प्रकाशक बांधील नाही.

१०. साहित्यातील मतांसाठी पूर्ण जबाबदारी लेखकाची असेल.

११. शिव्या, अभद्र भाषा टाळावी.

१२. व्याकरण, शुद्धलेखन यातील थोड्याफार चुका चालतील, परंतु खूप जास्त चुका असतील तर ते साहित्य स्वीकारले जाण्याची शक्यता कमी आहे.

१३. कमाल १५०० शब्दांपर्यंत साहित्य पाठवावे.

tejasvitadiwali@tkgoi.com  | 022 69647066